‘I don’t Trust anybody …’ राष्ट्राध्यक्ष जो बायडेन का म्हणाले असे ; जाणून घ्या

अफगाणिस्तानवर तालिबान्यानी कब्जा मिळवल्यानंतर प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तालिबानी व अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य केले.  इतकेच नव्हेतर तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथिलतेचे अडकून पडलेल्या अमेरिकन नागरिकांनाही सुखरूपणे परत आणले जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिली

  अमेरिका: ‘मी कुणावरही विश्वास ठेवत नाही’ असे प्रतिउत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबानवर विश्वास आहे की नाही असे विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे.

  आतापर्यंत तालिबानींनी कुठल्या प्रक्रारे अमेरिकी सैनिकांवर हल्ला केला नाही. तसेच तालिबान्यांनी आता पर्यंत जे काही विधानाने केलेले आहे ते त्याप्रमाणे वागणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. येत्या काळात इतर देशांकडून त्यांना मान्यता मिळते की नाही याकडेही त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.’ असे ही बायडेन म्हणाले.

  जो बायडेन यांनी नुकतेच व्हाईट हाऊसमधून जनतेला संबोधित करत असताना अफगाणिस्तान संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. अफगाणिस्तानवर तालिबान्यानी कब्जा मिळवल्यानंतर प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तालिबानी व अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य केले.  इतकेच नव्हेतर तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथिलतेचे अडकून पडलेल्या अमेरिकन नागरिकांनाही सुखरूपणे परत आणले जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिली. अमेरिकन नागरिकांना परत आणण्याचे मिशन सुरुच असल्याचेही ते म्हणाले आहेत.

   

   अमेरिकन सैन्याने जुलै अखेर व ऑगस्टपर्यंत जवळपास ३० हजार नागरिकांना आतापर्यंत अफगाणिस्तान यश आले आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेलया लोकांना परत आणण्याच्या मिशनला तूर्तास थांबवले आह . मात्र त्या संदर्भात अमेरिकन लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आपले बोलणे सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ३० ऑगस्टच्या आतमध्ये अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भांतील अनेक सुरक्षित झोन बाबतही लष्करी अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.