‘इडा’ची पिडा : अमेरिकेला इडा चक्रीवादळाचा तडाखा ; ४५ लोकांचा मृत्यू तर शेकडो घरं पाण्याखाली

अमेरिकेत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुराचे पाणी घरात शिरले असून रस्ते, रेल्वेमार्ग, घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत.ईस्ट कोस्टमध्ये चक्रीवादळामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र त्याचा प्रकोप एवढा भयंकर असेल असा अंदाजही कोणी व्यक्त केला नव्हता.

  ‘इडा’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा अमेरिकेला बसला असून सध्या येथे आणीबाणी जाहीर झाली आहे. अमेरिकेतील ईस्ट कोस्ट, न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार उडवला आहे. या नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमुळे येथे ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रमी पावसामुळे पाणीपातळी वाढली असून पुराचे पाणी घरांमध्ये शिरले आहे.

  अंदाजापेक्षाही भयंकर परिस्थिती

  अमेरिकेत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुराचे पाणी घरात शिरले असून रस्ते, रेल्वेमार्ग, घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत.ईस्ट कोस्टमध्ये चक्रीवादळामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र त्याचा प्रकोप एवढा भयंकर असेल असा अंदाजही कोणी व्यक्त केला नव्हता.

  आणीबाणी जाहीर

  न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच पुरामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूजर्सी, मल्लिका हिल परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे, रस्त्यांची स्थिती धोकादायक बनली आहे. या पूरसंकटात नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कच्या मेयर बिल डी ब्लासियो यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून आणीबाणीची घोषणा केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जातील, असे ब्लासियो यांनी जाहीर केले.