moderna vaccine

 बायोनटेक(bionteck) आणि  फाइजर(pfizer) यांच्या डेटा सेंटरवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर आता मॉडर्ना व्हॅक्सिनचा(moderna vaccine) डेटा चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. कंपनीच्या डेटा सेंटरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये कोरोना लसीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे चोरी झाली आहेत.

युरोपियन मेडिसिन एजन्सीने  हल्ल्याबाबत सूचना दिल्यानंतर मॉडर्ना कंपनीला सायबर हल्ला झाल्याबाबत समजलं . ही कागदपत्रे कंपनीने जेव्हा परवानगीसाठी सरकारकडे पाठवली होती त्या दरम्यान चोरण्यात आल्याचे समजते. दरम्यान, युरोपियन मेडिसिन एजन्सीने यापूर्वीच काही कंपन्यांच्या व्हॅक्सिनचा डेटा ॲक्सेस केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.

यापूर्वी फाइजर-बायोनटेक या दोन्ही कंपन्यांवरही व्हॅक्सिनच्या डेटासाठी सायबर हल्ला झाला होता. त्यावेळी कोरोना लसीशी संबंधित फाईल्सचा बेकायदेशीरपणे अ‍ॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.