In 10 seconds, the 144-storey building became horizontal, creating a new history

युएईच्या अबू धाबीमधील १४४ मजली टॉवर अवघ्या १० सेकंदात पाडण्यात आली. आता या इमारतीचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये समाविष्ट झाले आहे. कारण यापूर्वी एवढी उंच इमारत यापेक्षा कमी काळात कधीच पाडली गेली नव्हती. इमारत कोसळल्याचा  (building collapsed) व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करणारा आहे.

व्हिडिओ पहा…

हा धक्कादायक व्हिडिओ ८ डिसेंबर रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला होता. ही बातमी येण्यापर्यंत ७ हजाराहून अधिक प्रतिक्रिया आणि ५०० कमेंट आल्या आहेत.

अशी पाडली इमारत

मीना प्लाझाचा एक भागाला नियंत्रित डायनामाइट लावून हा १६५ मीटर उंच टॉवर पाडण्यात आला. अहवालानुसार इमारत पाडण्यासाठी ३००० हून अधिक डिटोनेटर्समार्फत ९१५ किलो स्फोटके सक्रिय करण्यात आली, त्यानंतर ही इमारत पाडण्यात आली.

In 10 seconds, the 144-storey building became horizontal, creating a new history

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की इमारत कोसळल्यानंतर धूळांचे ढग बनले आहेत. याबाबत एका वापरकर्त्याने लिहिले की जर पाणी शिंपडले गेले तर इतकी धूळ उडणार नाही. हे पूर्णपणे वायू प्रदूषण आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने सांगितले की, “मला वाटतं की टोनी स्टार्कने काही वर्षांपूर्वी हल्कशी लढा देताना हे केले होते.”