medical miracl

रिचर्ड गेल्या ८ वर्षांपासून अंथरूणाला खिळलेला. ना तो बोलू शकत होत, ना चालू शकत होता, ना खाऊ शकत होता. मात्र फक्त झोपेची एक गोळी दिली आणि काही मिनिटांतच तो उठून बसला. इतकंच नव्हे तर आपल्या वडिलांशी तो फोनवर बोलला आणि त्याने स्वत:हून फूड ऑर्डर दिली.

ॲमस्टरडॅम : एक व्यक्ती (person ) कित्येक वर्ष अंथरूणाला खिळून होती. ती बोलूही शकत नव्हती, (can’t speak ) चालत नव्हती, काही खाऊही शकली नाही. त्या व्यक्तीवर कोणतेच उपचार परिणामकारक ठरले नाहीत. मात्र एका औषधाने अवघ्या काही

८ वर्षांपूर्वी २९ वर्षांचा रिचर्ड मांस खात असताना मांसाचा तुकडा त्याच्या घशात अडकला. ज्यामुळे त्याचा श्वास कोंडला आणि परिणामी त्याच्या मेंदूला हानी पोहोचली. त्याला akinetic mutism ही मेंदूची दुर्मिळ समस्या उद्भवली. यामध्ये ती व्यक्ती बोलू शकत नाही, हलू शकत नाही. काही खाऊ शकत नाही. मात्र ती डोळ्याने सर्व पाहू शकते आणि आपण काय बोलत आहोत हे ऐकू शकते.

रिचर्डवर बरेच उपचार झाले, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शेवटी Zolpidem या झोपेच्या औषधाचा मेंदूच्या काही समस्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो, याबाबत डॉक्टरांना माहिती झाली. त्यांनी रिचर्डवर या औषधाचा प्रयोग करायचं ठरवलं. रिचर्डच्या कुटुंबाची यासाठी परवानगी घेतली. दुसरा कोणताच मार्ग दिसत नसल्याने रिचर्डचं कुटुंबदेखील तयार झालं.

रिचर्डला Zolpidem या झोपेच्या औषधाचा एक डोस देण्यात आला आणि औषध घेतल्यानंतर फक्त २० मिनिटांतच त्याचा परिणाम दिसून आला. मात्र या औषधाचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आता कायमस्वरूपी उपचारासाठीही डॉक्टर प्रयत्न करत आहेत.