कुलभूषण जाधव प्रकरणात भारताचे प्रयत्न ठरले यशस्वी, पाकिस्तानला करावा लागला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचा अध्यादेश मंजूर

पाकिस्तानने(Pakistan) आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाच्या ( पुनर्विचार ) अध्यादेशाला मंजूरी(International Court Order) दिली आहे. यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येणार आहे.

    इस्लामाबाद : कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांच्याप्रकरणी अखेर पाकिस्तानला झुकाव लागलं आहे. पाकिस्तानने(Pakistan) आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाच्या ( पुनर्विचार ) अध्यादेशाला मंजूरी(International Court Order) दिली आहे. यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येणार आहे.

    पाकिस्तानच्या(Pakistan) संसदेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयासंबंधी कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा मंजूर केला आहे. कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.

    कुलभूषण जाधव यांच्यावर एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने गुप्तहेरी आणि दहशतवादाचा आरोप ठेवत मृत्यूची शिक्षा दिली होती. भारताने जाधव यांच्या मृत्यूच्या शिक्षेला आव्हान देत पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला दणका दिला होता. कोर्टाने पाकिस्तानला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आणि जाधव यांना तत्काळ काऊंसलर उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने दिलेला आदेश लागू करावा यासाठी भारत पाकिस्तानसोबत संपर्क साधून होता.

    आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या ४२ पानी आदेशात कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेवर स्थगिती देण्यास सांगितले होते. तसेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची आणि जाधव यांना सोडण्याची मागणी पाकिस्तानने मान्य केली नव्हती. पाकिस्तानने जाधव यांच्या प्रकरणी कोणत्याही तडजोडीस नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर संविधानात असलेल्या तरतुदीनुसार पाऊल उचलले जाईल, असंही पाकिस्तानने म्हटलं होतं. पण, आता संसदेत कायदा मंजूर करुन पाकिस्तानने नमतं घेतलं.

    कुलभूषण जाधव २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते. भारत पूर्वीपासूनच सांगत आला आहे की, कूलभूषण जाधव माजी नौदल अधिकारी होते. इराणमध्ये ते एक बिजनेस डील करण्यासाठी गेले होते. येथे त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना पाकिस्तान आर्मीच्या ताब्यात देण्यात आले. पाकिस्तानने आरोप केलाय की, कुलभूषण एक गुप्तहेर आहेत आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.