फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना; ८५ जण प्रवास करणारं सैन्याचं विमान कोसळलं

फिलिपीन्सचे सैन्य प्रमुख सिरिलिटो सोबेजाना (General Cirilito Sobejana) यांनी सांगितले की, हा अपघात दक्षिणी फिलिपिन्समध्ये झाला. आतापर्यंत १५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी हे विमान सुलू राज्यातील जोलो बेटवर उतरण्याचा प्रयत्न करत होते.

    फिलिपीन्स : फिलिपिन्समध्ये (Southern Philippines) मोठी दुर्घटना झाल्याची धक्कादायक माहिती आली आहे. एक सैन्याचं विमान कोसळल्याची (Crashed) माहिती मिळाली आहे. अपघात झाला त्यावेळी विमानात ८५ जण होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.