लहान मुलांना सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी ‘या’ देशात मांडण्यात येणार संसदेत विधेयक, मुलांमध्ये वाढती फूड डिसऑर्डर, ड्रग्ज, पॉर्नबाबत चिंता

इंग्लंडमध्ये ऑनलाईन सेफ्टी कायदा तयार करण्यात येतो आहे. लहान मुलांना सोशल मीडिया कंपनीच्या दुष्परिणामांपासून वाचवण्याचा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. इंग्लंडच्या खासदारांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे.

    इंग्लंड : इंग्लंडमध्ये ऑनलाईन सेफ्टी कायदा तयार करण्यात येतो आहे. लहान मुलांना सोशल मीडिया कंपनीच्या दुष्परिणामांपासून वाचवण्याचा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. इंग्लंडच्या खासदारांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी इंग्लंडसोबतच अमेरिकेच्या फेसबुक, टिकटॉक, गुगल आणि ट्विटरच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले आहे. या प्रतिनिधींशी चर्चा करुन, कंपनीच्या कार्यप्रणालीची पडताळणी करण्याचा संसदेचा मानस आहे.

    हा कायदा तयार झाल्यानंतर, सोशल मीडिया कंपन्यांनी त्यातून पळवाटा शोधू नयेत, यासाठी ही सतर्कता बाळगण्यात येते आहे. हा कायदा अधिक सक्षम व्हा हाही यामागचा उद्देश आहे. अमेरिकेतही सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. फ्रान्सिस होगेन यांनी अमेरिकेच्या संसदेत साक्ष देताना फेसबुकच्या अनेक गुप्त बाबी समोर आणल्या आहेत.

    अमेरिकेची संसदही करतेय चौकशी

    अमेरिकेत या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच, एक पाऊल पुढे टाकत इंग्लंड आणि अन्य युरोपीय देशांनी ऑनलाईन सेफ्टी बिल आणण्याचे ठरविले आहे. त्यापूर्वी पडताळणीसाठी सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या संसदेत अशी चौकशी सुरु सतानाच, इंग्लंडमध्येही कंपन्याच्या प्रतिनिधींशी पडताळणी करण्यात येणार आहे.

    सोशल मीडिया साईट्समुळे लहान मुलांना फूड डिसऑर्डर, ड्रग्ज, पॉर्नसारख्या वाईट सवयी लागत असल्याचे इंग्लंडच्या खासदारांचे म्हणणे आहे. या साईट्सच्या अल्गोरिदममुळे मुलांना या साईट्सचे व्यसन लागत असल्याचाही धोका आहे. कोरोना काळात अमेरिकेत अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

    हा कायदा अधिक सक्षम व्हा यासाठी या विषयातील तज्ज्ञांची मतेही जाणून घेण्यात येत आहेत. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. नव्या कायद्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. एकूणच सोशल मीडिया आणि त्याचा मुलांमधील होत असलेला गैरवाप ही आता जागतिक समस्या ठरत असल्याचे दिसते आहे.