In this village in Italy, you can get a house for 90 rupees

रोम : पिझ्झा, बर्गरच्या किंमतीत तु्म्ही घर खरेदी करु शकता असे तुम्हाला कुणी सांगीतले तर. विश्वास नाही ना बसणार? होय पण हे खरं आहे. इटलीतील एका गावाने ही घोषणा केली आहे. मात्र, हे घर खरेदी करण्यासाठी एक अट घालण्यात आली आहे.

इटलीतील (Italy) मोलिझे भागातील कास्त्रोपिगनानो या गावाने केवळ ९० रुपयांमध्ये घर उपलब्ध करुन दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र, हे गाव मध्ययुगीन काळातील असल्याने जी व्यक्ती येथे घर खरेदी करेल त्याला संबंधित घराची दुरुस्ती करावी लागेल आणि त्यानंतर त्या घरात रहण्याची परवानगी मिळेल अशी अट घालण्यात आली आहे.

या गावाची लोकसंख्या अवघी ९०० इतकी आहे.  येथील अनेक घरे रिकामी पडून आहेत. यामुळे  येथील  घरांसाठी प्रशासनाने  या गावात राहण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना १ युरो म्हणजेच ९० रुपयांत घर देण्याची योजना सुरु केली आहे.

एवढ्या स्वस्त दरात घर विकणारं कास्त्रोपिगनानो हे जगातील एकमेव गाव ठरलं आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर येथील अनेक नागरिक गाव सोडून जाऊ लागले. १९६० नंतर येथील अनेक युवका रोजगार तसेच अन्य कारणांमुळे गाव सोडून स्थलांतरीत झाले. आता या गावात फक्त वृ्द्ध व्यक्ती उरल्या आहेत. म्हणून येथे राहणारे बहुतांश लोक  ७० पेक्षा अधिक वयाचे आहेत.

हे गाव पून्हा नव्याने वसवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ही स्वस्त घराची योजना प्रशासनाने आखली आहे. रिकामी घरे असलेल्या घर मालकांना नोटिसा पाठवून घरांची दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. तातडीने याची अंमबजवणी न झाल्यास  सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासन त्यांच्या घरांचा ताबा घेईल, असेही या नोटिसांमध्ये म्हटले आहे.

हे गाव स्कि रिसॉर्ट आणि समुद्रकिनाऱ्यावर असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे.