United Nations 40 countries criticized China for its slap in the face

कोरोना लसीचे २ लाख डोस दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने भारताचे आभार मानले आहेत. यूएन पीसकीपर्ससाठी भारताने कोरोना लस दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी शनिवारी ट्विट केले की, १७ फेब्रुवारी रोजीच्या पत्रामध्ये गुटेरेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. यात भारताचाही समावेश होता मात्र या विषाणूच्या लढाईबाबत भारत पहिल्यापासूनच आक्रमक राहिला आहे. भारताने वेळोवेळी अनेक उपयोजना राबवून काही प्रमाणात या विषाणूवर मात केली आहे. आता कोरोना विषाणूविरूद्धच्या जागतिक लढाईमधील नेतृत्त्व आणि जागतिक बाजारपेठेत कोविड-१९ विरोधी लसीचा तातडीने पुरवठा केल्याबद्दल भारताचे राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांनी कौतुक केले आहे. कोरोना लसीचे २ लाख डोस दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने भारताचे आभार मानले आहेत. यूएन पीसकीपर्ससाठी भारताने कोरोना लस दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी शनिवारी ट्विट केले की, १७ फेब्रुवारी रोजीच्या पत्रामध्ये गुटेरेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला ‘जागतिक नेता’ म्हणून संबोधल्याचेही तिरुमूर्ती यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे, ‘सरचिटणीस म्हणाले की, जागतिक साथीच्या विरोधातील प्रयत्नात भारत एक जागतिक नेता होता.’ तिरुमूर्ती यांनी ट्विट केलेल्या पत्राच्या एका अंशानुसार गुटेरेस म्हणाले की, दीडशेहून अधिक देशांना महत्वाची औषधे, चाचणी किट, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे देऊन जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारत एक ग्लोबल लीडर ठरला आहे.