hafij saeed

23 जून रोजी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराजवळ बॉम्बस्फोट केल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यावर भारत सरकारने उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान या माध्यमातून खोटा प्रचार करू पाहात असल्याचे भारताने म्हटले आहे.

    इस्लामाबाद : 23 जून रोजी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराजवळ बॉम्बस्फोट केल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यावर भारत सरकारने उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान या माध्यमातून खोटा प्रचार करू पाहात असल्याचे भारताने म्हटले आहे.

    पाकिस्तानचा दहशतवादाबाबत काय इतिहास आहे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती आहे. भारताविरोधात खोटा प्रचार करणे हे पाकिस्तानसाठी नवे नाही. पाकिस्ताने स्वत:ची जमीन दहशतवाद्यांना वापरू दिली आहे. येथूनच हे दहशतवादी भारताविरोधात कारवाई करत असतात.

    पाकिस्तानच्या नेतृत्वाने कायमच दहशतवादाचा पुरस्कार केला आहे. ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला या देशाने शहीद ठरविले आहे, असे म्हणत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पलटवार केला आहे. असे असले तरी भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी चार दिवसांचा वेळ लावला. सहसा भारत लगेचच पाकिस्तानला उत्तर देत असतो.