भारत-चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये रशियाच्या मॉस्कोत बैठक

रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये या बैठकीस सुरूवात झाली. या बैठकीमध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी, ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करा, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

पूर्व लडाखमधील (Ladakh) पँगॉंग झील भागातल्या चीनच्या घुसखोरीनंतर तणाव कायम राहीला होता. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल रात्री मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग (India-China defense ministers met in Moscow) यांची भेट घेतली. रशियाची (Russia) राजधानी मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये या बैठकीस सुरूवात झाली. या बैठकीमध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी, ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करा, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

भारताकडून संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारताचे राजदूत डी.बी.वेंकटेश वर्मा सुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. चीनचे संरक्षण मंत्री सुद्धा या परिषदेसाठी तेथे आले आहेत. चीनकडून या बैठकीची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात लडाखमध्ये सुरु झालेल्या सीमावादानंतर प्रथमच दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे.

पूर्व लडाखमधील चीन सीमेवरील परिस्थिती थोडीशी नाजूक आणि गंभीर आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी म्हटलं आहे. मात्र, लष्कराने उचललेल्या खबरदारीच्या पावलांमुळे ही परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.