भारताने केली चीनवर मात, मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व

ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतं. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली.

चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ ( United Nations Commission on the Status of Women) या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत (India) , चीन (China) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. तसेच चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत.

टीएस.तिरूमूर्ती यांनी दिली ट्विटरच्या माध्यमातून माहिती

प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतं. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी  ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.