european union meeting
प्रतिकात्मक फोटो

युरोपियन युनियनची इंडो-पॅसिफिक रणनीती सप्टेंबरमध्ये ठरेल. स्लोव्हेनिया ३ सप्टेंबर(European Union Meeting) रोजी युरोपियन युनियन परराष्ट्र व्यवहार परिषदेचे आयोजन करेल, ज्यामध्ये युरोपियन युनियनचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील.

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(S Jayshankar) यांना स्लोव्हेनियातील ३ सप्टेंबरला होणाऱ्या युरोपियन युनियनच्या(European Union Meeting) अनौपचारिक बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या अनौपचारिक बैठकीत सहभागी होण्यासाठी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर(Dr. Jayshankar Invited In European Union Meeting) यांना विशेष आमंत्रण दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

    या बैठकीत अफगाणिस्तानमधील घडामोडी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीबाबत चर्चा होऊ शकते. युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांव्यतिरिक्त भारत, अमेरिका आणि केनिया यांना खास आमंत्रण देण्यात आले आहे.

    युरोपियन युनियनची इंडो-पॅसिफिक रणनीती सप्टेंबरमध्ये ठरेल. स्लोव्हेनिया ३ सप्टेंबर रोजी युरोपियन युनियन परराष्ट्र व्यवहार परिषदेचे आयोजन करेल, ज्यामध्ये युरोपियन युनियनचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील.

    अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या दिवशी भारताने अधिकृतपणे तालिबानसोबत चर्चा केली. भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई यांच्याशी चर्चा करून तेथील भारतीयांच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली. अफगाणिस्तानमधील संघर्षांच्या परिस्थतीत भारताच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या कृतिगटाला केली होती.