‘या’ त्रिसुत्रींवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी समिटचं आयोजन, भारताला आमंत्रण ; चीनने घेतला धसका

 या समिटमध्ये चार देशांमधील पायाभूत सुविधा, जलवायू प्रक्रिया उद्योग, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लसींच्या वितरणाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात एका उच्चस्तरीय कार्यक्रमात भाषण करणार आहेत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा क्वाडमध्ये समावेश आहे.

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून २४ सप्टेंबरला ते क्वाड समिटमध्ये हजेरी लावणार आहेत. अमेरिकेत होणाऱ्या क्वाड समिटसाठी भारताला आमंत्रण पाठवण्यात (Amrica invites India for QUAD summit) आलं असून चीनची पोटदुखी अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परस्पर सहकार्य, व्यापार आणि सुरक्षा या त्रिसुत्रींवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी या समिटचं आयोजन करण्यात आलं असून अमेरिकेत ही बैठक पार पडणार आहे.

    या समिटमध्ये चार देशांमधील पायाभूत सुविधा, जलवायू प्रक्रिया उद्योग, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लसींच्या वितरणाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात एका उच्चस्तरीय कार्यक्रमात भाषण करणार आहेत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा क्वाडमध्ये समावेश आहे.

    परस्पर सहकार्य आणि सुरक्षेच्या कारणासाठी क्वाडची स्थापना करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर भारताला जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचं सहकार्य मिळत असल्यामुळे चीनची पोटदुखी वाढण्याची शक्यता आहे.