भारतानं गोळीबार करून चिनी सैन्याला धमकावलं, चीनचा नवा कांगावा

गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत चालला आहे. अशातच काल सोमवारी रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केल्याचा आरोप चीनने केला आहे. लडाखच्या पँगॉंग त्सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.

भारतीय सैनिकांनी कायद्याचं उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात चिनी सैनिकांवर वार्निंग शॉट्स फायर केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत चालला आहे. अशातच काल सोमवारी रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केल्याचा आरोप चीनने केला आहे. लडाखच्या पँगॉंग त्सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.

चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चिनी लष्कराचे वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्यांच्या हवाल्यानं पँगाँग त्सोच्या नजीक चकमक झाल्याचा दावा केला आहे. “भारतीय लष्करानं पँगाँग त्सो नजीक असलेल्या शेनपाओ या ठिकाणी एलएसी ओलांडली. चर्चेचे प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या बॉर्डर पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर भारतीय जवानांनी वॉर्निंग शॉट्स फायर केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या जवानांनाही कारवाई करावी लागली, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

चिनी लष्कराचे प्रवक्ते सीनियर कर्नल जांग शियुली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, भारतीय सैनिकांनी भारत-चीन सीमारेषेवरील पश्चिम भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि पँगोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील शेनपाओ पर्वतरांगांच्या भागात घुसले.