भारत पाकिस्तानला देणार कोव्हिशिल्ड लसीचे १.६ कोटी डोस, शत्रुत्व विसरून मानवतावादी दृष्टीकोन

आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानला भारताकडून कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे पाकिस्तानमधील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक तंगीत असणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून १.६ कोटी कोव्हिशिल्ड लसींचे डोस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. भारताचं शत्रूराष्ट्र हीच आता पाकिस्तानची ओळख बनली आहे. सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कुरापती करणे, सीमेपलिकडून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न करणे, जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता माजवणे यासारखी कृत्ये पाकिस्तान सातत्यानं करत आला आहे. मात्र सध्या आर्थिक दिवाळखोरीत अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून मदत केली जाणार आहे.

    आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानला भारताकडून कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे पाकिस्तानमधील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक तंगीत असणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून १.६ कोटी कोव्हिशिल्ड लसींचे डोस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    द ग्लोबल अलायन्स फॉर वैक्सीन अँड इम्युनायजेशन या जागतिक संघटनेच्या उपक्रमाद्वारे ही लस पाकिस्तानला पाठवली जाणार आहे. जगातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास देशांतील नागरिकांना आरोग्यसुविधा मिळाव्यात, यासाठी ही संघटना कार्यरत आहे. अनेक गरीब देशांप्रमाणेच पाकिस्तानलादेखील कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा केला जाणार आहे. या महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच १५ मार्चच्या आसपास हे डोस पाकिस्तानमध्ये पोहोचतील, असं सांगितलं जातंय.

    पाकिस्ताननं भारताकडे थेट लसीची मागणी केलेली नाही. काही आठवड्यांपूर्वी चीनकडून पाकिस्तानला लसींचे डोस पुरवण्यात आले होते. मात्र त्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर आता या संघटनेमार्फत मिळणाऱ्या लसींवर पाकिस्तानची भिस्त आहे. पाकिस्तान स्वतः कुठल्याही लसी खरेदी करणार नसून मोफत मिळणाऱ्या लसींवरच अवलंबून राहिल, असं सांगण्यात आलंय.