१६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. वायुसेनेनं सी-१७ विमान भारतात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचं एका विमानानं शनिवारी ८७ भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. तेही विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे.

    अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज सकाळी काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.

    अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. वायुसेनेनं सी-१७ विमान भारतात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचं एका विमानानं शनिवारी ८७ भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. तेही विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे.

    गेल्या २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे.