hari shukla

ब्रिटनमध्ये लसीकरणाला(corona vaccination in UK) सुरूवात होणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना लसीचा जगातील सर्वात पहिला डोस एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जाणार आहे.

ब्रिटनने गेल्या आठवड्यात फायझर व बायोएनटेकच्या लसीला वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर ब्रिटनमध्ये लसीकरणाला(corona vaccination in UK) सुरूवात होणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना लसीचा जगातील सर्वात पहिला डोस एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जाणार आहे. ब्रिटनमध्ये(Britain) कोरोना लसीकरण कार्यक्रमाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. यात राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात येणार आहे.

भारतीय वंशाच्या ८७ वर्षीय हरी शुक्ला(Hari Shukla) यांना ही लस सर्वप्रथम देण्यात येणार आहे. “लसीचे पहिले दोन डोस घेणं हे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लसीकरणासंदर्भात घोषणा करून एक मोठं पाऊल उचललं आहे,” अशी प्रतिक्रिया हरी शुक्ला यांनी दिली आहे. त्यांनी लस आपल्याला सगळ्यात आधी दिली जाणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते या उपक्रमासाठी खूप उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लस घेऊन मी आपलं काम करत असल्याचा आनंद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच ८० आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ही लस सर्वात प्रथम देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून लसीच्या आठ छोट्या बॉटल उपलब्ध होणार असून, सरकारनं ४ कोटी कुप्यांची(छोट्या बॉटल्सची) मागणी नोंदवली आहे. त्यातून २ कोटी लोकांना लस देता येईल, कारण लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहेत.