India's digital strike China makes serious allegations against India after government bans 43 Chinese apps

चिनी प्रवक्त्या जी रोंग यांनी ट्विट करत भारताच्या निर्णयाचा विरोध केला आहे. भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप रोंग यांनी केला आहे.

बिजींग : डिजीटल स्ट्राईक करत भारताने ४३ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालत चीनला जबरदस्त झटका दिला आहे. या कारवाईनंतर चीनने भारत सरकारवर गंभीर आरोप केा आहे. भारताकडून घेण्यात आलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.  हे अ‍ॅप्स भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकारने ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. सरकारने बंदी घातलेल्या मोबाईलल ॲपमध्ये लालामूव सारख्या अनेक हायपर लोकल ॲपसह अनेक डेटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. तसेच हॅपी फिश, जेलीपॉप मॅच यासरखे गेमींग अ‍ॅप्स देखील बंद करण्यात आले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप हे चायनिज अ‍ॅप आहेत.

चिनी प्रवक्त्या जी रोंग यांनी ट्विट करत भारताच्या निर्णयाचा विरोध केला आहे. भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप रोंग यांनी केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत अ‍ॅप्सवर बंदी घातली असून चीन याचा विरोध करत असल्याचे रोंग यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वांना निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसाय करु येईल तसेच कोणताही भेदभाव होणार नाही अशी आशा करतो असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

“चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत,” असं मतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.