भारताचा मित्र पाकच्या मदतीला; रशियाने उघडला पाकिस्तानसाठी खजिना

भारताचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला चीनकडून कायम मदत दिली जाते. भारताला शह देण्यासाठी, भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानला सातत्याने मदत करतो. मात्र आता भारताचा जुना आणि खास मित्र मानल्या जाणाऱ्या रशियाने पाकिस्तानसाठी खजिना उघडला आहे. रशियातील कासूर ते पाकिस्तानमधील कराचीपर्यंत एक पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठीच्या करारावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे.

    इस्‍लामाबाद : भारताचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला चीनकडून कायम मदत दिली जाते. भारताला शह देण्यासाठी, भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानला सातत्याने मदत करतो. मात्र आता भारताचा जुना आणि खास मित्र मानल्या जाणाऱ्या रशियाने पाकिस्तानसाठी खजिना उघडला आहे. रशियातील कासूर ते पाकिस्तानमधील कराचीपर्यंत एक पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठीच्या करारावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे.

    पाकिस्तान आणि रशियामधील प्रकल्प दोन देशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कराचीमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. या वायू वाहिनीचे नाव आधी उत्तर-दक्षिण वायूवाहिनी असे होते. आता त्याला पाकिस्तान वाफ वायू वाहिनी, असे नाव देण्यात आले आहे. शीतयुद्ध काळात चीन आणि रशियामधील संबंध ताणले गेले होते. मात्र त्यावेळी निर्माण झालेली कटुता कमी करून संबंध सुधारण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.

    रशिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वायू वाहिनीसाठी कराराला 2015 मध्येच मूर्त स्वरुप मिळाले होते. मात्र रशियन कंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादल्यानं वायू वाहिनीचे काम बारगळले. पाकिस्तान वाफ वायू वाहिनीची लांबी 1122 किलोमीटर असणार आहे. दोन्ही देशांनी मिळून प्रकल्पातील अडथळे दूर करून नवा करार केला आहे. यानुसार वायू वाहिनीत 74 टक्के हिस्सा पाकिस्तानचा असेल. याआधी संपूर्ण वाहिनीचे काम रशिया करणार होता. त्यासाठी 2.25 अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. वायू वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रशियातून पाकिस्तानला वायूची निर्यात केली जाईल.