Israeli prime minister Benjamin Netanyahu,

अनेक महिन्यांपासून तेल अवीवच्या रस्त्यांवर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू(netanyahu) यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोपही करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाच्या संसदेत संसद बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्तावावर घेण्यात आलेल्या मतदानामध्ये संसद बरखास्त करण्याच्या बाजूने ६१ तर विरोधात ५४ मतं पडली. पुढील आठवड्यात अंतिम मतदान होईल.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू(netanyahu) अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत.नेतान्याहू यांच्यासकट संपूर्ण इस्रायलवरच राजकीय संकट ओढवले आहे. इस्रायलची संसद म्हणजेच नेसेट बरखास्त करण्याचा प्राथमिक प्रस्ताव बहुमताने संमत झाला आहे. हा प्रस्ताव संमत झाल्याने इस्रायलमध्ये दोन वर्षात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होण्याची (election in Israel)शक्यता आहे. नेतान्याहू यांच्यासोबत युती करुन सत्तेत असणारे सहयोगी बेनी गेंट्ज यांनी नेतान्याहू यांना दिलेलं वचन पाळलं नाही असा आरोप केला आहे. गेंट्ज यांनी नेतान्याहू यांच्याविरोधात मतदान केलं आहे.

अनेक महिन्यांपासून तेल अवीवच्या रस्त्यांवर नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोपही करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाच्या संसदेत संसद बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्तावावर घेण्यात आलेल्या मतदानामध्ये संसद बरखास्त करण्याच्या बाजूने ६१ तर विरोधात ५४ मतं पडली. पुढील आठवड्यात अंतिम मतदान होईल. त्यानंतर संसद बरखास्त करण्यात येऊ शकते. मग मार्च किंवा एप्रिल महिन्यात देशात पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे. अंतिम मतदानापर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून सध्या सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पुढील काही दिवसांमध्ये अनेक बैठका घेऊ शकतात.

संसदेत मतदान झालेल्या प्रस्तावाला नेसेट समितीची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. ही मंजुरी मिळाल्यानंतर दोन वेळा मतदान घेतलं जाईल. नेत्यान्याहू हे लिकुड पक्षाचे अध्यक्ष आहेत. गेंट्ज ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट पक्षाचे नेते आहेत. मे महिन्यामध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र सरकार बनवण्यावर संमती दर्शवली होती. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एक ठराव झाला होता. त्यानुसार पहिल्या १८ महिन्यांसाठी नेत्यान्याहू पंतप्रधान राहणार होते तर पुढील १८ महिने गेंट्स पंतप्रधान पदी विराजमान होणार होते. मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरु झाल्या.

नेत्यान्याहू यांनी युती करताना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत असं गेंट्स यांनी म्हटलं आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यातील वाटचाल करणं कठीण आहे. गेंट्स यांनी आपला सहकारी पक्षाचा नेता काय करत आहे हे दुसऱ्या पक्षाला ठाऊक असायला हवं असं मत व्यक्त केलं आहे.