भारत-चीन पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर, सिक्कीमध्ये सुद्धा चीनचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न

गेल्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली.

पूर्व लडाख सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात अद्यापही संघर्ष सुरूच आहे. चीनच्या सैनिकांनी लडाख सीमेजवळ अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. परंतु भारतीय सैन्याने चीनचा हा डाव उधळून लावला आहे.

गेल्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली.

सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतानाही, भारतीय जवानांनी चीनचा घुसखोरीचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही.