sacred forest of indoneshia

इंडोनेशियातील पापुआ (Papua) इथं असणारं हे जंगल अतिशय पवित्र मानलं जातं. हे खारफुटीचं जंगल ( Forest) आहे. इथं महिलांना कपडे घालण्यासही(Women going Naked In Jungle) मनाई आहे.

    जकार्ता : इंडोनेशियातल्या (Indonesia sacred forest) एका पवित्र जंगलाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे इंडोनेशियातील हे जंगल खास महिलांसाठी आहे. या जंगलात महिलांशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. पुरुषांना इथं येण्यास सक्त मनाई आहे. चुकून कोणी गेलंच तर त्याला जबर शिक्षा होते. इथे वावरताना स्त्रिया कपडे घालत नाहीत (Naked women in jungle).

    इंडोनेशियातील पापुआ (Papua) इथं असणारं हे जंगल अतिशय पवित्र मानलं जातं. हे खारफुटीचं जंगल (Mangrove Forest) आहे. इथं महिलांना कपडे घालण्यासही मनाई आहे. इथं ज्या स्त्रिया जातात त्यांना कपडे घालता येत नाहीत. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. स्त्रिया नैसर्गिक अवस्थेत फिरतात. महिलांच्या सुरक्षेसाठी पुरुषांना इथं येण्याची परवानगी नाही.

    चुकून एखादा पुरुष इथं डोकावताना आढळला तर त्याला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागते. कोणी प्रयत्न केल्यास त्यांना इथल्या आदिवासी जमातीच्या न्यायालयात (Tribe Court) नेलं जातं. नियमांनुसार त्याला पाच हजारांपेक्षा जास्त दंड भरावा लागतो. हा दंड विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडांच्या रूपात असतो.

    इथं राहणाऱ्या महिला खास प्रकारचे शिंपले (Sea shells) गोळा करून त्यांची विक्री करतात. यासाठी त्या समूहानं इथल्या समुद्रात आणि चिखलात उतरतात. मात्र आता शहरातील लोकवस्ती वाढत वाढत जंगलापर्यंत आली आहे. त्यामुळे या महिलांना आपल्या कामात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळंही इथल्या पर्यावरणाचा नाश होत आहे. पूर्वीच्या प्रमाणात इथं शिंपले मिळत नाहीत. आता हे शिंपले शोधण्यासाठी या महिलांना अनेक तास काहीवेळा संपूर्ण दिवस पाण्यात शोध घ्यावा लागतो. मात्र इथल्या महिलांनी ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.