inflation hit in pakistan egg for 30 rupees one thousand rupees ginger and wheat for 60 rupees selling in nrvb

पाकिस्तानात गव्हाच्या किंमतींनी यावर्षी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत उच्चांक गाठला. येथे प्रति ४० किलो गव्हासाठी २४०० रुपये अर्थात किलोला ६० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. गेल्या डिसेंबरमध्ये देशात परिस्थिती खूपच बिकट होऊ लागली आहे. त्यावेळी गव्हाची किंमत ४० किलोसाठी २००० रुपयांवर गेली होती. या वर्षी ऑक्टोबरमध्येच हा विक्रम मो़डला.

इस्लामाबाद : एक अंडे ३० रुपयांना. १०४ रुपये किलो साखर ६० रुपये किलो गहू आणि एक हजार रुपये किलो आलं. हा एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा भाव नसून तो आपल्या शेजारील देश पाकिस्तानातला रोजच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा आहे. पाकिस्तानचे नवनिर्माणाचा नारा देणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान साखरेच्या किंमती कमी होतील असा दावा करून बसले आहेत आणि स्वत:चीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत. पण, वस्तूस्थिती अशी आहे की, या महागाईने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

एवढ्या महागाईने इथली लोक त्रासली आहेत. पाकिस्तानातल्या ड डॉनच्या वृत्तानुसार, देशातल्या अधिकाधिक भागांत थंडीत मागणी वाढल्याने अंड्यांचे भाव ३५० पाकिस्तानी रुपये प्रति डझन झाले आहेत. पाकिस्तानात २५% हून अधिक लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालच्या गटात मोडते. ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आपल्या खाण्यात अंड्यांचा वापर करते.

पाकिस्तानात गव्हाच्या किंमतींनी यावर्षी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत उच्चांक गाठला. येथे प्रति ४० किलो गव्हासाठी २४०० रुपये अर्थात किलोला ६० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. गेल्या डिसेंबरमध्ये देशात परिस्थिती खूपच बिकट होऊ लागली आहे. त्यावेळी गव्हाची किंमत ४० किलोसाठी २००० रुपयांवर गेली होती. या वर्षी ऑक्टोबरमध्येच हा विक्रम मो़डला.

पाकिस्तानला येत्या नव्या वर्षात गॅस संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. देशात गॅसची पुरवठादार कंपनी सुई नॉर्दनने ५०० मिलियन स्टँडर्ड क्युबिक फीट प्रति दिन कमतरतेचा सामाना करावा लागणार आहे. तथापि इमरान खान सरकारने वेळेवर गॅस विकतच घेतलेला नाही, ज्याचे परिणाम आता देशवासियांना भोगावे लागणार आहेत.

पीठ-साखरेचे भाव कमी करण्यासाठी ओढवली आहे बैठकांची नामुश्की

पाकिस्तानला सध्या धान्य टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान या आधी जगभर कांद्याची निर्यात करत होता. आता त्यांना त्यांच्याच देशातल्या कांद्याच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी कांदा आयात करावा लागत आहे. पीठ आणि साखरेचे भाव कमी करण्यासाठी इमरान खान सातत्याने कॅबिनेट आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात व्यस्त आहेत.