india china

भारतातील या भयाण परिस्थितीची चीननं खिल्ली उडवलीय. त्यामुळं चीनचा विकृत चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. कोरोनामुळं मरणाऱ्यांच्या चितांवरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी खिल्ली उडवली आणि त्यानंतर जगभरातून कम्युनिस्ट पार्टीवर टीका होऊ लागलीय. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलंय. 

    जग सध्या कोरोनाचा सामना करतंय. भारतात कोरोनाची दुसरी लाट आलीय. देशात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाखांकडून आता ४ लाखांकडे जात असल्याचं चित्र आहे. भारतात ठिकठिकाणी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार होत असल्याचं चित्र असून देशाची परिस्थिती अत्यंत भयाण आहे.

    भारतातील या भयाण परिस्थितीची चीननं खिल्ली उडवलीय. त्यामुळं चीनचा विकृत चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. कोरोनामुळं मरणाऱ्यांच्या चितांवरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी खिल्ली उडवली आणि त्यानंतर जगभरातून कम्युनिस्ट पार्टीवर टीका होऊ लागलीय. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलंय.

    या ट्विटमध्ये एका बाजूला चीन रॉकेट लॉन्च करत असल्याचा फोटो तर दुसऱ्या बाजूलाआ भारतात पेटणाऱ्या चितांचा फोटो लावण्यात आलाय. चीनमध्ये आग जळणे विरुद्ध भारतात आग जळणे, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय. या ट्विटनंतर चीनमधूनदेखील यावर टीका होत आहे. शिवाय जगभरातील नेटिझन्सची चीनच्या असंवेदनशीलतेबाबत जोरदार टीका केलीय.

    चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनीही या प्रकारावर टीका केली असून आत्ताच्या काळात भारतासाठी मानवतेचा झेंडा हाती घ्यायला हवा, असं म्हटलं आहे.