महिलेला चाकूचा धाक दाखवून पैसाअडका चोरण्याऐवजी भलतंच काहीतरी केलं लंपास

लंडनमधील (London) बेलमोंट रोड परिसरात ही घटना घडली आहे. एक महिला कुत्र्याला सकाळच्या वेळेत सैर करण्यासाठी बाहेर घेऊन गेली होती. त्यावेळी चोरांनी चाकू दाखवून तिच्या कुत्र्याची चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लंडन : चाकूचा धाक दाखवून पैसे, दागिने यांची चोरी करतात हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं. परंतु या चोराने भलतीच चोरी केली असून चक्क… कुत्र्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेला चाकूचा धाक दाखवून कुत्रा (Dog) चोरल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील (London) बेलमोंट रोड परिसरात ही घटना घडली आहे. एक महिला कुत्र्याला सकाळच्या वेळेत सैर करण्यासाठी बाहेर घेऊन गेली होती. त्यावेळी चोरांनी चाकू दाखवून तिच्या कुत्र्याची चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांनी तिच्या सहा महिन्यांच्या कुत्र्याची चोरी केली. या कुत्र्याचे नाव ‘वेफल’ असून या महिलेने यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या महिलेला एका व्यक्तीने फोन करून कुत्र्याला त्यांच्या ताब्यात सोपवण्याची धमकी दिली होती. तसंच कुत्र्याला त्याच्या ताब्यात न दिल्यास चाकूने मारण्याची देखील धमकी दिली होती. त्यानंतर थेट चाकूचा धाक दाखवून चोरी करण्यात आली आहे. ही एक धक्कादायक घटना असून पोलीस त्या चोराचा शोध घेत आहेत.