international coffee day

आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेकडून(International Coffee Organization) २०१५ मध्ये इटलीमधील मिलान येथे पहिला आंतरराष्ट्रीय कॉफी दिन(International Coffee Day 2021) साजरा करण्यात आला होता. हा दिवस जगभरात कॉफीचं उत्पादन घेणाऱ्या लोकांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

  दरवर्षी १ ऑक्टोबरला जगभरात आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस(International Coffee Day 2021) साजरा केला जातो. जे लोक शेतापासून दुकानापर्यंत कॉफी(International Coffee Day Special Article) पोहोचवण्यासाठी मेहनत घेतात त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कॉफी पिणं प्रत्येकालाच आवडतं. तज्ञांच्या मते, कॉफीचं(Coffee Is Good For Health) सेवन आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करतं.

  आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेकडून २०१५ मध्ये इटलीमधील मिलान येथे पहिला आंतरराष्ट्रीय कॉफी दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस जगभरात कॉफीचं उत्पादन घेणाऱ्या लोकांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.भारताच्या तुलनेत परदेशात कॉफी पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र भारतातील शहरी भागात राहणाऱ्या अनेकांच्या दिवसाची सुरुवात रोज कॉफी पिऊनच होते. कॉफीशी निगडीत काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • कॉफी योग्य प्रमाणात प्यायल्यास तणाव कमी होतो. मात्र अति सेवन घातक ठरू शकते.
  • कॉफी प्यायल्यामुळे काही प्रमाणात त्वचेचा कॅन्सर आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
  • भारतात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये कॉफीचे सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाते.
  • कॉफी उत्पादक देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. जगातील एकूण कॉफी उत्पादनापैकी ४ टक्के कॉफी उत्पादन भारतातून होते.
  • इथियोपियाच्या एका मेंढपाळाने जगात सगळ्यात आधी कॉफी बिन्स शोधून काढले.
  • जगात सगळ्यात जास्त कॉफी उत्पादन ब्राझील, व्हिएतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया आणि इथियोपिया देशामध्ये होते.
  • भारतातली कॉफी जगभरात उत्तम गुणवत्तेची कॉफी मानली जाते.