आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींनी गाठली उच्चांक, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका

केंद्र किंवा राज्य सरकारने (Central or State Government) पेट्रोल आणि डिझेलच्या ( petrol-diesel prices ) वाढत्या महागाईवर (Inflation) त्वरीत आळा बसवला नाही, तर पुढील दोन महिन्यांत पेट्रोलची किंमती शंभरी पार करेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International oil prices) खनिज तेल्याच्या किंमतींनी उच्चांक गाठली आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या ( petrol-diesel prices ) वाढत्या महागाईवर त्वरीत आळा बसवला नाही, तर पुढील दोन महिन्यांत पेट्रोलची किंमती शंभरी पार करेल. ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाची किंमत ३५.७९ प्रति डॉलर होती. परंतु नोव्हेंबर महिन्यात ती किंमत वाढली असून ४५.३४ प्रति डॉलर इतकी होती. केवळ एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत २६.६८ टक्के वाढ झाली.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी खनिज तेलाचे (Crude Oil) उत्पादन वाढवण्याठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे अमेरिका कच्चा तेल्याच्या आयतेच्या जागेवर शुद्ध निर्यातक तेल बनलं. परंतु अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन (Joe Biden) यांनी तेलाबाबत प्रोत्साहन देणार नाही. असं म्हटलं आहे. कारण की यामुळे अमेरिका पुन्हा एकदा शुद्ध आयात उत्पादक म्हणून बनेल. वॅक्सीन तयार झाल्यानंतर जगभरात आर्थिक स्थिती वाढेल. यामुळे कच्चा तेलाची डिमांड (Demand) वाढून किंमतीत सुद्धा भर होईल.

खनिज तेलाची काय आहे किंमत

पुढील दोन महिन्यात कच्चा तेलाची किंमती ५६ डॉलर प्रति बॅरल पर्यंत वाढेल. तर एंजेल ब्रोकिंगच्या कमोडीटी रिसर्चचे प्रमुख अनुज गुप्ता यांच्या अनुमानानुसार, पुढील दोन महिन्यात कच्चा तेलाची किंमत ५५ ते ५६ डॉलर प्रति बॅरल एवढी होईल.