‘मिरॅकल’ कोंबडा ; डोके कापल्यानंतरही १८ महिने जिवंत राहिला

देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. अशाच एक चमत्कारी प्रकार कोंबड्याबरोबर घडला आहे. अमेरिकेतील एका कोंबड्याचे डोके कापल्यानंतरही तो १८ महिने जिवंत राहिला डोके नसताना ही एखादा कोंबडा पाहुन लोकं पार हैराण झालेले.

देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. अशाच एक चमत्कारी प्रकार कोंबड्याबरोबर घडला आहे. अमेरिकेतील एका कोंबड्याचे डोके कापल्यानंतरही तो १८ महिने जिवंत राहिला डोके नसताना ही एखादा कोंबडा पाहुन लोकं पार हैराण झालेले.

काय आहे प्रकरण
अमेरिकेत आजपासून ७२ वर्षांपूर्वी एक विचीत्र घटना घडली. १०सप्टेंबर १९४५ रोजी अमेरिकेतील कोलाराडो येथील फ्रेटामध्ये राहणारे लॉयड ऑल्सेन आपली पत्नी क्लारा सोबत त्यांच्या पोलर्टी फार्मवर कोंबडे कापत होते. त्यावेळी लॉयड यांनी साधारण पाच महिन्याच्या एका कोंबड्याचे डोके कापले, परंतु त्यावेळेस तो कोंबडा मेला नाही, तर डोके नसतानाही तो पळु लागला.हा प्रकार पाहुन दोघे उभयंता अतिशय घाबरून गेले. त्यांना कळलेच नाही की हा काय प्रकार सुरू आहे, त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी लगेचच कोंबड्याला पकडले व एका बॉक्समध्ये बंद केले. त्यांना वाटले की कदाचित काही वेळानंतर तो मरण पावेल पण सकाळी उठल्यावर जेव्हात्यांनी कोबंड्याला बघितले तेव्हा त्यांना तो चक्क जिंवत दिसला. डोके कापल्यानंतरही जिवंत राहिलेल्या या कोबंड्याची बातमी हळूहळू अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये झपाट्याने पसरायला लागली. असे म्हणतात की सॉल्ट लेक शहरात स्थित युटायुनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी या कोबंड्याच्या जिवंत राहण्यामागचे कारण शोधण्याचे अनेक प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी अनेक कोबंड्यांचे डोके कापले पण त्यातील एकही कोबंडा या कोंबड्याप्रमाणे जिंवत राहिला नाही. या कोंबड्याच्या अशा प्रकारे जिवंत राहिल्याने लोकांनी त्याचे नाव ‘मिरेकल माइक’ नाव दिले होते. मिडिया रिपोर्ट्स प्रमाणे या कोबंड्याला नळीच्या सहाय्याने ड्रॉप्सस्वरूपात ज्यूससारखे पदार्थ दिले जात होते आणि सिरींजच्या सहाय्याने त्याची अन्न् नलिका साफ करण्यात यायची जेणेकरून त्याचा श्वास गुदमरू नये.

चक्क १८ महिन्यांपर्यंत जिवंत राहीला कोंबडा

अखेर तब्बल १८ महिन्यांनतर मार्च १९४७ मध्ये या कोबंड्याचा मृत्यू झाला. असे सांगण्यात आले की, लॉयड ऑल्सेन ज्यूस दिल्या नंतर त्याची अन्न नलिका काही दिवस साफ करू शकला नव्हता कारण ते सिरिंज त्याच्याकडुन हरवले होते, आणि यामुळे कोबंड्याचा श्वास कोंडुन मृत्यू झाला.या आगळ्यावेगळ्या कोबंड्याची म्हणजेच ‘मिरेकल माइक’ ची ख्याती सर्वत्र ईतकी पसरली होती की लॉयड ओल्सेनने त्याला पाहण्यासाठी टिकट ठेवले होते. त्यातुन तो दर महिन्याला ४५०० डॉलर कमवत होता. या कोबंड्यामुळे लॉयडची आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधरली होती.

कोबंड्याचे पूर्ण डोक्याच्या नस त्याच्या डोळ्यांच्या मागील भागाच्या एका छोट्याशा भागात असतात. या कोबंड्याची चोच, चेहरा आणि डोळे निघालेहोते, परंतु त्याच्या डोक्याचा अंदाजे ८० टक्के हिस्सा वाचला होता ज्यामुळे त्याचे शरीर, श्वास, भूख आणि पचन तंत्र चालू होते.असे बीबीसीच्या अहवालानुसार, न्यूकैसल युनिवर्सिटी मधील सेन्टर फॉर बिहैवियर आणि इव्होल्यूशन मधील चिकन एक्सपर्ट डॉ. टॉम स्मल्डर्स यांनी सांगितले. या कोबंड्याच्या आठवणीत आजही फ्रूटा शहरात प्रत्येक वर्षी’हेडलेस चिकन’ महोत्सव केला जातो ज्याची सुरूवात १९९९मध्ये झाली होती. या महोत्सवात हजारो लोक सहभागी होतात, अनेक प्रकारचे खेळ आणि कार्यक्रम येथे होतात.