इराणच्या मुख्य अणूशास्त्रज्ञांची हत्या, इराण घेणार बदला, या देशांकडे संशयाची सुई

इराणच्या क्रांतीकारी गार्ड कमांडरच्या म्हणण्यानुसार इराणकडून वैज्ञानिकांच्या हत्येचा बदला घेतला जाईल. यापूर्वीदेखील इराणनं ज्याप्रकारे अस्मितेवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेतला, तसाच याहीवेळी घेतला जाईल, असं म्हटलं आहे. शुक्रवारी दामवंद भागात मोहसीन यांची हत्या झाल्याची बातमी इराणमधील माध्यमांनी दिलीय.

इराणचे मुख्य अणूशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजायेद यांची हत्या करण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेहरानजवळ ही घटना घडलीय. मोहसीन यांना इराणी बॉम्बचे जनक म्हणून ओळखलं जायचं.

इराणच्या क्रांतीकारी गार्ड कमांडरच्या म्हणण्यानुसार इराणकडून वैज्ञानिकांच्या हत्येचा बदला घेतला जाईल. यापूर्वीदेखील इराणनं ज्याप्रकारे अस्मितेवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेतला, तसाच याहीवेळी घेतला जाईल, असं म्हटलं आहे. शुक्रवारी दामवंद भागात मोहसीन यांची हत्या झाल्याची बातमी इराणमधील माध्यमांनी दिलीय.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सौदी अरेबियाला गुप्त भेट दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच अरब माध्यमांमध्ये उघड झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. इस्त्रायल आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांचं इराणशी असणारं वैर सर्वांनाच माहित आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आशियात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

मोहसीन फखरीजायेद हे इराणमधील हुसैन विश्वविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इराणच्या सुरक्षा मंत्रालयातील प्रमुख वैज्ञानिकपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

मोहसीन यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुठल्याही संघटनेनं अद्याप या हत्येची जबाबदारी स्विकारलेली नाही.