इराणच्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा बदला घेतला ? घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

गुप्तहेरांच्या जगतात आपला दबदबा कायम करणाऱ्या इस्त्रायली गुप्तचर यंत्रणा अर्थातच मोसादच्या कमांडरची हत्या करण्यात आली आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे ४५ वर्षीय मोसाद कमांडरला ठार करण्यात आल्याची माहिती इराणी मीडियाने दिली आहे. ही हत्या कोणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण ही हत्या इराणने सूड घेण्यासाठी केला असल्याचा दावा अनेकांकडून सोशल मीडियावर केला जात आहे.

तेल अवीव (Tel Avive).  गुप्तहेरांच्या जगतात आपला दबदबा कायम करणाऱ्या इस्त्रायली गुप्तचर यंत्रणा अर्थातच मोसादच्या कमांडरची हत्या करण्यात आली आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे ४५ वर्षीय मोसाद कमांडरला ठार करण्यात आल्याची माहिती इराणी मीडियाने दिली आहे. ही हत्या कोणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण ही हत्या इराणने सूड घेण्यासाठी केला असल्याचा दावा अनेकांकडून सोशल मीडियावर केला जात आहे.

इराणच्या गुप्तचर यंत्रणेने हिनावीची हत्या करून इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येचा बदला घेतला आहे, असा दावाही केला जात आहे. इस्त्राइलची राजधानी तेल अवीव या ठिकाणी एका 45 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचं स्थानिक मीडियानेही कबुल केलं आहे.

इराणी अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येचा बदला ?
इराणी माध्यमांनी असा दावा केला आहे, की मारलेला व्यक्ती इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचा वरिष्ठ कमांडर होता. गुरुवारी त्याची हत्या करण्यात आली असून मारल्या गेलेल्या मोसादच्या अधिकाऱ्याचे नाव फहमी हिनावी आहे. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियामध्येही प्रचंड व्हायरल होत आहे.

हल्लेखोरांनी भर रस्त्यात झाडल्या गोळ्या
इराणच्या अधिकृत माध्यमांनी असं म्हटलं आहे, की मारला गेलेला इस्त्रायली मोसाद कमांडर तेल अवीव येथील एका सिग्नलवर कार घेऊन थांबला होता. तेव्हा अचानक हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर १५ गोळ्या झाडल्या. ही थरारक घटना घडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची अद्याप खात्री पटली नाही.