आर्थिक प्रश्नांवर आंदोलने घडविल्या प्रकरणी इराणच्या पत्रकारास फाशी

तेहरान : इराणचे पत्रकार रुहोल्ला झॉम यांना शनिवारी सकाळी फाशी देण्यात आली. ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून २०१७ मध्ये आर्थिक मुद्दय़ांवरून देशव्यापी निदर्शने घडवून आणल्याबाबत ही फाशी देण्यात आली. त्यांना जूनमध्ये न्यायालयाने देशातील सरकार उलथवण्याचे प्रयत्न केल्याच्या या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.त्यांच्यावर हेरगिरी करण्याचाही आरोप होता.

झॅम यांच्या संकेतस्थळावर व टेलिग्राम वाहिनीवर प्रसारित करण्यात आलेला संदेशामुळे सरकारविरोधी आंदोलनास पाठबळ मिळाले होते. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून इराणमधील ईश्वरसत्ताक शिया राजवटीला आव्हान दिले होते. इराणमध्ये २०१७ मध्ये झालेली सरकारविरोधी निदर्शने मोठी व व्यापक स्वरूपाची होती. ते २००९ मधील ग्रीन मूव्हमेंटनंतरचे सर्वात मोठे आंदोलन होते. त्यांच्या सामाजिक माध्यमातील संदेशांमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सरकारला पुन्हा आंदोलनाचा सामना करावा लागला होता.