याला आत्मविश्वास म्हणायचं की अजून काय? पाकिस्तान म्हणतंय, “एक दिवस सगळे संघ आमच्या देशात खेळायला येतील”

शेख रशीद म्हणाले की, "न्यूझीलंडमध्ये फौज नसेल एवढं सैन्य आम्ही न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात केलं होतं. इंग्लडने दौरा रद्द केला तेव्हाच न्यूझीलंड देखील दौरा रद्द करेल याचा अंदाज आला होता.या दोन्ही देशांनी दौरा रद्द केल्यानंतर त्यांना वाटलं असेल की, पाकिस्तान आता एकटा पडेल.

    इस्लामाबाद : पाकिस्तनमध्ये विदेशी लोकांचा प्रश्नकायम ऐरणीवर असतो. अशातच आत खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.अशातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांंनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एक दिवस आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्व खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळायला येतील, असं म्हटलं आहे. यानंतर जगभरातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

    काय म्हणाले शेख रशीद?
    शेख रशीद म्हणाले की, “न्यूझीलंडमध्ये फौज नसेल एवढं सैन्य आम्ही न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात केलं होतं. इंग्लडने दौरा रद्द केला तेव्हाच न्यूझीलंड देखील दौरा रद्द करेल याचा अंदाज आला होता.या दोन्ही देशांनी दौरा रद्द केल्यानंतर त्यांना वाटलं असेल की, पाकिस्तान आता एकटा पडेल. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. एक दिवस असा येईल की, जेव्हा आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्व संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास येतील, असा मला विश्वास आहे.”