150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त खरं की खोटं? भारत सरकारचा मोठा खुलासा

भारतात परतण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या 150 भारतीयांचे तालिबानने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तथापि, भारत सरकारशी संबंधित सूत्रांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वच भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी आणि त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांचे आभार मानतो असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

    काबूल : भारतात परतण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या 150 भारतीयांचे तालिबानने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तथापि, भारत सरकारशी संबंधित सूत्रांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वच भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी आणि त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांचे आभार मानतो असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

    दुसरीकडे, भारतीय नागरिकांचे अपहरण केल्याचा दावा तालिबानने फेटाळून लावला आहे.काबूल विमानतळावरून कोणाचेही अपहरण करण्यात आले असून सर्व भारतीयांना सुरक्षित मार्गाने विमानतळापर्यंत पोहोचविले असे स्पष्ट केले. कोणत्याही अफगाणी नागरिकाने देश सोडून पळून जाऊ नये यासाठी पासपोर्ट आदीच्या चौकशीसाठी त्यांना थांबविण्यात आले होते, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.