ISIS या दहशतवादी संघटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी; आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू तर २००हून अधिक जखमी

या धक्कादायक घटनेमुळे काबूल विमान विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री पहिला स्फोट हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अबे गेटवर झाला. तर दुसरा स्फोट विमानतळाजवळील बॅरॉन हॉटेलजवळ(Baron Hotel) जिथे ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते, त्या ठिकाणी झाला आहे.

  काबूल: अफगाणिस्तानची(Afghanistan) राजधानी काबूलमधील(kabul) हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर(Hamid Karzai International Airport) काल(गुरुवारी) संध्याकाळी झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्ब हल्यात झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत ८० लोकांचा मृत्यू तर २०० होऊन अधिकजण जखमी झाल्याचा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तवाहिनेने केला आहे. ‘इसिस’ (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या खोरासन गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात यूएसचा १२ जवानांचा मृत्यू झाला आहे,तर १५ जवान जखमी असल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे काबूल विमान विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री पहिला स्फोट हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अबे गेटवर झाला. तर दुसरा स्फोट विमानतळाजवळील बॅरॉन हॉटेलजवळ(Baron Hotel) जिथे ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते, त्या ठिकाणी झाला आहे.

  हल्लेखोरांना सोडणार नाही – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी काबूल विमानतळावरील हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, सैनिकांचा मृत्यू अत्यंत दु: खदायक आहे, इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही किंवा क्षमा करणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना शोधून ठार मारू. सैनिकांच्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना.आम्ही अमेरिकन नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका करू आणि आमच्या अफगाण मित्रांना बाहेर काढू, आमचे मिशन चालूचा असून, गरज पडल्यास आम्ही अतिरिक्त सैन्यही पाठवू.

  तालिबाननेही हा हल्ला  दहशतवाद्यांनी केला असल्याचे म्हटले आहे. तालिबान्यांनी आतापर्यंत केवळ १५ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

  तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून अफगाण लोक देशसोडून जाण्यासाठी प्रेतायतन करत आहेत. त्यासाठी मोठ्याप्रमाणात काबूल विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याने लोक भेदरून गेले आहे. हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या आपल्या आप्तेष्टांचे मृतदेहशोधले जात आहेत तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

  प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार या हल्ल्याचे प्रमुख लक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक होते. इटालियन विमानावर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. या विमानात इटली व्यतिरिक्त इतर काही देशांचे नागरिक होते.

  बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक
  काबूल विमानतळावर दोन स्फोट झाल्याचे समजताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन उपस्थित होते. याशिवाय जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल मार्क मिल्ली देखील उपस्थित होते. या घटनेनंतर अफगाणिस्तानबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती व्हाईट हाऊस सूत्रांनी दिल्याचे समोर आले आहे.

  घटनेपूर्वीच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने सरकारकडून आपल्या नागरिकांना काबूल विमानतळावर जाऊ नका आणि जे विमानतळाच्या बाहेर उपस्थित आहेत त्यांनी त्वरित निघून जावे असे सांगण्यात आले होते.