ISIS भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत : मंदिरांना लक्ष्य करण्याचा कट ; अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी संपर्कात

तालिबान ही एक क्रूर संघटना असून, सत्तेत आल्यानंतर त्यांची कार्यपद्धती बदलेल का, याबाबत सांगणे अवघड आहे. असे मत अफगाणिस्थान सोडल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याचे जनरल मार्क मिल्ले यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन सैन्याचे मिशन योग्य दिशेने सुरु राहावे आणि सैन्याला कमीत कमी जोखीम पत्करावी लागेल, या बाबी लक्षात घेऊनच आत्तापर्यंत तालिबानला हाताळण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    नवी दिल्ली :  काबूल विमानतळावर हल्ला करणारी दहशतवादी संघटना ISIS, आता भारतावार हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती आहे. भारतातील मंदिरे ISISच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात असलेले दहशतवादी ISISच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर आणि कर्नाटकात अटक करण्यात आलेल्या काही संशयीतांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    तालिबान क्रूर संघटना- अमेरिका
    तालिबान ही एक क्रूर संघटना असून, सत्तेत आल्यानंतर त्यांची कार्यपद्धती बदलेल का, याबाबत सांगणे अवघड आहे. असे मत अफगाणिस्थान सोडल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याचे जनरल मार्क मिल्ले यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन सैन्याचे मिशन योग्य दिशेने सुरु राहावे आणि सैन्याला कमीत कमी जोखीम पत्करावी लागेल, या बाबी लक्षात घेऊनच आत्तापर्यंत तालिबानला हाताळण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर भविष्यात तालिबानसोबत सहकार्याबाबत आत्ताच काही विधान करणे घाईचे ठरेल, असे मत ऑस्टिन यांनी व्यक्त केले आहे. आगामी काळात ISIS-K वर अमेरिकेचे विशेष लक्ष असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर ISIS-खुरासान ही संघटना अमेरिकेच्या निशाण्यावर आली आहे. या आत्मघाती हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिक मारले गेले होते. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, हल्लेखोरांना शोधून यमसदनी पाठवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर ३६ तासांतच अफगाणिस्थानात नंगरहार प्रांतात अमेरिकेने ड्रोन हल्ले केले, त्यात ISIS-K च्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.