अफगाणिस्ताननंतर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलं रशियाला टार्गेट ?, युद्ध पेटण्याची शक्यता; रशियाने पाठवली ३० रणगाड्यांची कुमक

अफगाणिस्तानात गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती तालिबान्यांना जे हवं होतं ते मिळाल्यामुळं अफगाणिस्तानात आता शांतता निर्माण होईल असं वाटत होतं. अमेरिकासुद्धा अफगाणिस्तानातून निघून गेल्यानं युद्धाची स्थिती नसेल असं वाटत होतं. पण अफगाणिस्तानातच आता गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती आहे.

    अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर विविध प्रकारच्या घडामोडी काबुलमध्ये घडत आहेत. आधी अमेरिका विरुद्ध तालिबानी, नंतर अफगाणी विरुद्ध तालिबानी आणि आता अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध ही समस्या डोकं वर काढू लागली आहे. परंतु आता रशियाच्या बफरझोनमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.

    अफगाणिस्तानात गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती तालिबान्यांना जे हवं होतं ते मिळाल्यामुळं अफगाणिस्तानात आता शांतता निर्माण होईल असं वाटत होतं. अमेरिकासुद्धा अफगाणिस्तानातून निघून गेल्यानं युद्धाची स्थिती नसेल असं वाटत होतं. पण अफगाणिस्तानातच आता गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती आहे.

    तालिबान्यांच्या राज्यात अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं आहे. येथे शेजारच्या देशांना निशाणा बनवण्यासाठी १० हजार जिहादी सीमांवर तैनात आहेत. ISIS ताजिकिस्तान, उझबेकिस्तानमध्ये घुसखोरी करण्याची शक्यता अफगाणिस्तान व मध्य आशियाई देशांच्या सीमेवर ISIS चे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ISIS चे १० हजार दहशतवादी रशियाच्या सीमेवर असल्याची माहिती रशियाने दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इसिसचे १० हजार दहशतवादी रशियाच्या सीमेवर आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी आपले अड्डे बनवले आहेत. तिथून ते शेजारच्या ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानात जाणार आहे. इसिसचे दहशतवादी कुठल्याही क्षणी घुसखोरी करु शकतात. याच कारणामुळे रशियाने ताजिकिस्तानला ३० अत्याधुनिक रणगाडे पाठवले आहेत.