इस्त्रायलचे मास्कमुक्तीकडे आणखी एक पाऊल, आता इनडोअर मास्क लावण्याची गरज नाही, लहान मुलांचं लसीकरणही सुरू

इस्त्रायलमध्ये इनडोअर मास्क लावण्याची गरज नाही, असा निर्णय़ सरकारनं घेतलाय. आजपासून (मंगळवार) इस्त्रायलमध्ये इनडोअर मास्क लावण्याची सक्ती उठवण्यात येत असल्याची घोषणा इस्त्रायलच्या आरोग्य खात्यानं केलीय. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत जे सहभागी आहेत, त्यांना मात्र मास्क लावणं बंधनकारक असल्याचं इस्त्रायलनं म्हटलंय.

    कोरोनाशी लढण्यात आघाडीवर असलेला आणि जगात सर्वाधिक वेगानं या संकटातून बाहेर पडणारा देश म्हणून इस्त्रायलची ओळख आहे. इस्त्रायलचं शिस्तबद्ध नियोजन, अंमलबजावणी आणि रणनिती यांच्या मदतीनं कोरोनावर जलद मात केलीय. कमी लोकसंख्या असल्याचा फायदा तर इस्त्रायलला झालाच, मात्र आता मास्कपासूनदेखील इस्त्रायली नागरिकांची सुटका होत असल्याचं चित्र आहे.

    इस्त्रायलमध्ये इनडोअर मास्क लावण्याची गरज नाही, असा निर्णय़ सरकारनं घेतलाय. आजपासून (मंगळवार) इस्त्रायलमध्ये इनडोअर मास्क लावण्याची सक्ती उठवण्यात येत असल्याची घोषणा इस्त्रायलच्या आरोग्य खात्यानं केलीय. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत जे सहभागी आहेत, त्यांना मात्र मास्क लावणं बंधनकारक असल्याचं इस्त्रायलनं म्हटलंय.

    याशिवाय ज्या नागरिकांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस आणि सतत गर्दीत राहणारे कर्मचारी यांनादेखील त्यांच्या व्यक्तीगत सुरक्षेसाठी मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्याशिवाय परदेशातून इस्त्रायलमध्ये येणाऱ्या नागरिकांना किमान १० दिवस मास्क लावण्याची सक्ती असणार आहे.

    इस्त्रायलमध्ये १३ जूनपासून १२ ते १५ या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. या वयातील ६ लाख मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेमध्ये असणारी मास्क लावण्याची सक्ती हटवण्याबाबत विचार केला जाईल, असं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय. इस्त्रायलमध्ये सध्या केवळ २१२ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यापैकी २९ जणांनी प्रकृती गंभीर आहे.