इस्त्रायलमध्ये अस्थिरता, दोन वर्षात होतेय चौथ्यांदा निवडणूक, ७ महिन्यांत पडलं सरकार

गेल्या दोन वर्षात तीन वेळा इस्त्रायलमध्ये सत्ता स्थापन केलेलं सरकार गडगडल्यामुळे देशाच्या राजकाणात कमालीची अस्थिरता निर्माण झालीय. आता पुढ्च्या वर्षी चौथ्यांदा इस्त्रायलची जनता सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहे. सध्या नेतान्याहू यांचा लिकूड पक्ष आणि संरक्षण मंत्री बेनी गेंत्ज यांचा ब्लू अँड व्हाईट पक्ष यांनी एकत्र येत सध्याचं सरकार स्थापन केलं होतं.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालचं आघाडी सरकार मंगळवारी कोसळल्यानंतर इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झालीय. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ सालात नव्याने निवडणुका होणार, हे आता स्पष्ट झालंय.

गेल्या दोन वर्षात तीन वेळा इस्त्रायलमध्ये सत्ता स्थापन केलेलं सरकार गडगडल्यामुळे देशाच्या राजकाणात कमालीची अस्थिरता निर्माण झालीय. आता पुढ्च्या वर्षी चौथ्यांदा इस्त्रायलची जनता सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहे. सध्या नेतान्याहू यांचा लिकूड पक्ष आणि संरक्षण मंत्री बेनी गेंत्ज यांचा ब्लू अँड व्हाईट पक्ष यांनी एकत्र येत सध्याचं सरकार स्थापन केलं होतं.

कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळण्याचा सिलसिला गेल्या तीन निवडणुकांपासून इस्त्रायलमध्ये सुरू आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांचा भर देशाच्या विकासाऐवजी स्वतःवर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपातून वाचण्याकडे असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आतापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्पदेखील इस्त्रायलमध्ये मंजूर होऊ शकलेला नाही. पुढील वर्षी २३ मार्च रोजी इस्त्रायलमध्ये निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी सहयोगी पक्षावर कडाडून टीका केलीय. ब्लू अँड व्हाईट पक्षानं मान्य केलेल्या अटी पाळल्या नाहीत. देशाला सध्या निवडणूक परवडणारी नाही. अगोदरच कोरोनाचं मोठं आव्हान देशासमोर असताना राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नसल्याचं नेतान्याहू यांनी म्हटलंय.