इस्राइलकडून गाझा पट्टीवर पुन्हा एकदा हवाई हल्ला, अनेक नागरिकांचा मृत्यू…

    इस्त्राइल आणि पॅलेस्टिनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळला आहे. इस्त्राइलने केलेल्या रॉकेट हल्ल्यात 9 मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर हमासकडून जेरुसलेमवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. हसामच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा इस्त्राइलने हल्ला केला आहे.

    दरम्यान रमजान महिन्यात शेवटच्या दिवशी हा हल्ला झाला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढला आहे. तसेचं जगातील अनक देशानी या दोन देशांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका ब्रिटन आणि युरोपीय संघाने इस्त्राइल आणि पॅलेस्टिनला शांततापूर्व वातावरण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

    या हिंसक हल्ल्यात 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेचं आणखी 24 लोकांचाही मृत्यू झाला आहे. इस्त्राइल आणि पॅलेस्टिन यांच्यातील अनेक वर्षातील हा हिंसक दिवस असल्याचं माहिती समोर आहे. मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरु असतानाच इस्त्राइलमधील जेरुसेलमच्या अल – अक्सा मशिदीबाहेर इस्त्राइली आणि पॅलेस्टिन आंदोलक यांच्यात हिंसक झडप झाली होती.

    दरम्यान यावेळी दगडफेक करणाऱ्या आंदोलकावर इस्त्रायली पोलिसांनी रबराच्या गोळ्या आणि स्टॅन ग्रेनेडचा वापर केला आहे. इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. म्हणाले की, हमासने आपली मर्यादा ओलांडली आहे. इस्त्राइल याला सडेतोड प्रत्यूत्तर देईल. हसामचे तीन दहशतवादी या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. अशी माहिती इस्त्राइलच्या लष्करांने दिली आहे.