इस्त्रायलचा गाझापट्टीवर पुन्हा हवाई हल्ला, गजातून आगीचे फुगे सोडल्यानंतर केली कारवाई

बेंजामिन न्येतन्याहू यांची पंतप्रधान म्हणून १२ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येऊन इस्त्रायलमध्ये नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्त्वाखालचं नवीन आघाडी सरकार अस्तित्त्वात आल्यानंतरची इस्त्रायल आणि गाझामधली ही पहिली हिंसक चकमक आहे. इस्रायलच्या सत्ताधाऱ्यांमध्ये हा बदल झाला असला तरी हमाससोबतच्या कडवटपणात बदल झालेला दिसून येत नाहीये.

  बुधवारी सकाळी इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ला केला. AFP या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. गाझापट्टीमधल्या हमासच्या तळांवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केला असल्याचे इस्रायलनेदेखील सांगितले आहे . गाझामधून इस्त्रायलकडे आगीचे फुगे सोडण्यात आल्यानंतर इस्रायलने हा हल्ला केला.

  युध्दविरामानंतर पुन्हा हल्ले सुरु

  गेल्या महिन्यात इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने हवाईहल्ले करण्यात आले होते, ज्यात अधिक नुकसान गाझापट्टीत झाल्याचे दिसून आले होते. मात्र त्यांनतर तब्ब्ल ११ दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला होता. आता सगळं शांत होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा इस्रायल आणि गाझा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.मंगळवारी गाझामधून इस्रायलमध्ये आग लावू शकतील असे काही फुगे पाठवण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्याचं इस्रायलच्या अग्निशमन विभागाने म्हटलं आहे.

  इस्रायलमधील १२ वर्षांच्या सत्तांतरानंतरही धुसफूस कायम

  बेंजामिन न्येतन्याहू यांची पंतप्रधान म्हणून १२ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येऊन इस्त्रायलमध्ये नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्त्वाखालचं नवीन आघाडी सरकार अस्तित्त्वात आल्यानंतरची इस्त्रायल आणि गाझामधली ही पहिली हिंसक चकमक आहे. इस्रायलच्या सत्ताधाऱ्यांमध्ये हा बदल झाला असला तरी हमाससोबतच्या कडवटपणात बदल झालेला दिसून येत नाहीये. मंगळवारी इस्रायलमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी एक विशाल मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीच्या अवघ्या काही तासानंनतर हा हल्ला करण्यात आला आहे.