नाकावाटे कोरोना लस देणे होणार शक्य, अमेरिकन संशोधकांचा दावा

प्रयोगात असे दिसून आले की, नसेत इंजेक्शन दिल्यास फ्कत कोरोनाच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. तर नाकावाटे लस दिल्यास श्वसनसंस्थेत तसेच संपूर्ण शरीरात कोरोनाचा प्रसार होण्यास प्रतिबंध होतो.

वॉशिंग्टन : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश कोरोनाप्रतिबंधक लसीची निर्मिती करत आहेत. काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावाही केला आहे. अमेरिकेन संशोधकांनी कोरोनावरील लस टोचण्याऐवजी नाकात थेंब किंवा फवारा मारता येईल. असा दावा केला आहे. तसेच कोरोना लस तयार केल्याचा आणि उंदरावरील प्रयोगाचा अपेक्षित निष्कर्ष असल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिन च्या वैज्ञानिकांनी एका निवेदनात म्हटले की, या लशीचे उंदरावर नाकात थेंब टाकून तसेच इंजेक्शन नसेत टोचून दोन्ही प्रकारचे प्रयोग करण्यात आले.

या प्रयोगात असे दिसून आले की, नसेत इंजेक्शन दिल्यास फ्कत कोरोनाच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. तर नाकावाटे लस दिल्यास श्वसनसंस्थेत तसेच संपूर्ण शरीरात कोरोनाचा प्रसार होण्यास प्रतिबंध होतो. यबाबत पुढील काही महिन्यांत हा प्रयोग मानवावर करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु हा प्रयोग केव्हा पुर्ण होईल हे अद्याप स्पष्ट नाही. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व नियामक संस्थाकडून संमती मिळाली तर सध्या तोंडात थेंब घालून जशी पोलिओची लस दिली जाते तशीच नाकात थेंब टाकून कोरोनाची लस देणे शक्य होऊ शकते.