ऐकूनच गारठायला होतंय ! उणे ७१ डिग्री सेल्सिअस आहे या गावाचं तापमान ; जगातलं सर्वात थंड गाव म्हणून आहे ओळख

मॉस्को : यंदा थंडी अधिक असेल असा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये हाडं गोठवणारी थंडी असते, त्या तुलनेत आपल्याकडे थंडीचे प्रमाण कमी असते. असंही एक शहर आहे जिथे उणे ७१ अंशापर्यंत तापमान घसरतं. तिथेही लोकवस्ती आहे. रशियातील (Russia) सायबेरिया (Siberia) गावातील ओम्याकोन (Oymyakon) येथील थंडीत लोकांची स्थिती अतिशय खराब होते.

या गावात थंडीमुळे अशी परिस्थिती होते की, कोणतंचं पीक येथे पिकत नाही. लोक मुख्यत: मांस खाऊनच आपलं जीवन जगतात.थंडीच्या दिवसांत येथे लहान मुलं सरासरी -५० डिग्री तापमानपर्यंतच शाळेत जातात. यापेक्षा तापमान खाली गेल्यास, शाळा बंद केल्या जातात.लहान मुलांना येथील तापमानानुसार तयार केलं जातं. त्यामुळे ११ वर्षांपर्यंत मुलांना थंडीपासून वाचण्यासाठी -५६ डिग्री सेल्सियसहून तापमान खाली गेल्यास, घरी राहण्याची परवानगी आहे. थंडीत दिवसाच तापमान -४५ ते -५० डिग्री सेल्सियसपर्यंत असतं. त्यामुळे सर्व मुलांना शाळेत जावं लागतं. येथे डिसेंबर महिन्यात सूर्य १० वाजण्याच्या जवळपास उगवलेला दिसतो.अंटार्कटिकाबाहेर याला जगातील सर्वात थंड ठिकाण मानलं जातं. १९२४ मध्ये या जागेचं तापमान -७२.२डिग्री सेल्सियस रेकॉर्ड करण्यात आलं होतं. २०१८ च्या आकड्यांनुसार, या गावात ५०० ते ९०० लोक राहतात.या कडाक्याच्या थंडीत येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गाड्यांची बॅटरी गोठली जाऊ नये, त्यासाठी गाड्या दररोज स्टार्ट ठेवाव्या लागतात. येथील लोकं वेगवेगळ्या प्रकारचं मांस खातात. घोड्याच्या मांसाशिवाय स्ट्रोगनीना माशाचं सेवन केलं जातं. जून-जुलैमध्ये जगभरातील अनेक भागात भयंकर उन्हाळा असतो, त्यावेळी येथील तापमान २० डिग्री सेल्सियसपर्यंत असतं.