जपानच्या अभियंत्यांचा नवा विश्वविक्रम, मिळवलाय जगातला Highest Internet Speed, वाचा सविस्तर

जपानच्या अभियंत्यांनी(Japanese Engineer's Record)  ३१९ टीबीपीएस (Tbps) स्पीडद्वारे नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे. केवळ १ वर्षातच या अभियंत्यांनी पूर्वीचे रेकॉर्ड तोडून डबल स्पीड इंटरनेट मिळवले आहे.

    इंटरनेट (Internet) हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. बाजारात ४ जी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अनेक कंपन्या असतानाही अनेकवेळा इंटरनेट स्पीड कमी होत असतो. कंपन्या त्यांच्या इंटरनेटचा स्पीड वाढवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. आता जपानने (Japan) या संदर्भात एक नवीन चाचणी केली आहे. जिथे एक एचडी व्हिडिओ किंवा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी अनेक तास लागतात, तिथे जपानच्या अभियंत्यांनी ३१९ टीबीपीएसचा स्पीड(Highest Internet Speed In the World) प्राप्त केले आहे.

    हा स्पीड आतापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे. अशाप्रकारे जपानच्या अभियंत्यांनी(Japanese Engineer’s Record)  ३१९ टीबीपीएस (Tbps) स्पीडद्वारे नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे. केवळ १ वर्षातच या अभियंत्यांनी पूर्वीचे रेकॉर्ड तोडून डबल स्पीड इंटरनेट मिळवले आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या प्रयोगशाळेत टेस्टिंग दरम्यान इंटरनेटची गती ३१९ टेराबाईट्सवर आली आहे. मागील वर्षी अशाच एका चाचणीत हा वेग १७८ टेराबाईट आला होता.

    आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमेरिकेची अंतराळ संस्था नासा देखील प्रति सेकंद ४४० गीगाबाईटचा इंटरनेट स्पीड वापरते. आपण या स्पीडचा अंदाज यावरून लावू शकता की, या स्पीडद्वारे एका सेकंदात हजारो चित्रपट डाऊनलोड केले जाऊ शकतात. जपानच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या या चाचणीचा अहवाल गेल्या महिन्यात ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला होता.

    संशोधकांचा असा दावा आहे की आपण ३१९ TB च्या स्पीडने केवळ १ सेकंदामध्ये ५७००० चित्रपट डाऊनलोड करू शकतो. तसेच आपण स्पॉटिफायची संपूर्ण लायब्ररी ३ सेकंदात डाउनलोड करू शकतो. यासाठी एनआयआयसीटीने ३००१ किमी लांबीचे ट्रान्समिशन तयार केले होते.