Japanese passport became the most powerful passport in the world
Japanese passport on a world map

या यादीत दोन नंबरवर सिंगापूर, तीन नंबर वर जर्मनी आणि द.कोरिया आहेत. भारताचे या यादीतील स्थान यंदा घसरून 90 वर आले आहे. गेल्या वर्षी भारतीय पासपोर्ट 84 नंबरवर होता. भारतीय पासपोर्ट धारक जगातील 58 देशात विना विसा किंवा विसा ऑन अरायव्हल सुविधा मिळविण्यास पात्र आहेत.

    दरवर्षी जगभरातील देशांच्या पासपोर्टचे रँकिंग ठरविले जाते आणि त्यानुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल आहे त्याची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार 2021 सालासाठीचे पासपोर्ट रँकिंग प्रसिद्ध झाले आहे. यंदाच्या वर्षी जपानचा पासपोर्ट जगातील पॉवरफुल पासपोर्ट ठरला आहे. हेनले अँड पार्टनर्सच्या रिपोर्ट नुसार जपानी पासपोर्ट धारक जगातील 193 देशात विसा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल सुविधा मिळण्यास पात्र आहेत.

    या यादीत दोन नंबरवर सिंगापूर, तीन नंबर वर जर्मनी आणि द.कोरिया आहेत. भारताचे या यादीतील स्थान यंदा घसरून 90 वर आले आहे. गेल्या वर्षी भारतीय पासपोर्ट 84 नंबरवर होता. भारतीय पासपोर्ट धारक जगातील 58 देशात विना विसा किंवा विसा ऑन अरायव्हल सुविधा मिळविण्यास पात्र आहेत.

    या यादीत सात नंबरवर चार देश आहेत. अमेरिका, युके, बेल्जियम व न्यूझीलंड देशांचा त्यात समावेश आहे. 2011 मध्ये चीन 90 नंबरवर होता तो यावर्षी 68 व्या नंबरवर आला आहे तर युएईने 65 वरून 15 नंबरवर झेप घेतली आहे. पाकिस्तान शेवटून चार नंबरवर आहे तर शेवटचा नंबर अफगाणिस्थानचा आहे.