‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस आज देणार राजीनामा ; जाणून घ्या कारण

सुमारे ३० वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. बेझोसने फेब्रुवारीत असे स्पष्ट केले होते की, इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी 'ब्ल्यू ओरिजिन'वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला पद सोडावेच लागणार आहे.

    न्यूयॉर्क : एका आभासी ‘बुक स्टोअर’च्या माध्यमातून ‘अ‍ॅमेझॉन’ची स्थापना करून जगभरात नावाजलेला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ‘अ‍ॅमेझॉन’ची ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस सोमवार, दि. ५ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा देणार आहेत. बेझोस यांची जागा ‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’चे संचालक अ‍ॅण्डी जेसी घेणार आहेत.

    सुमारे ३० वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. बेझोसने फेब्रुवारीत असे स्पष्ट केले होते की, इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी ‘ब्ल्यू ओरिजिन’वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला पद सोडावेच लागणार आहे. दरम्यान, बेझोस यांनी सध्या त्यांच्या नव्या अंतराळ मोहिमेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.

    Jeff Bezos Amazon founder will resign today