अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास, जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले

आज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली. 

    अंतराळ यात्रेने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) चे रॉकेट न्यू शेफर्ड (New Shepard) ने चार प्रवाशांना सुखरूप अंतराळात पोहोचवले होते. यानंतर 4 मिनिटे ही कॅप्सूल अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप पोहोचली आहे. यामध्ये बेझोसदेखील होते.

    आज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली.

    १९६० च्या दशकामध्ये मर्क्युरी १३ नावाचा एक गट तयार करण्यात आला होता. यामध्ये व्हॅली फ्रॅंक यांचाही समावेश होता. पुरुष अंतराळ प्रवाशांप्रमाणेच या महिलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि स्क्रिनींगची प्रक्रिया पार पाडावी लागली. पण त्यांना अंतराळात जाण्याची संधी देण्यात आली नव्हती.