जेफ बेझोस यांच ‘स्पेस टुरिझम’, कशी असेल ही अंतराळवारी? एका रॉकेटच्या माध्यमातून हे यान लॉन्च करण्यात येणार

बेझोस यांची कंपनी 'ब्ल्यू ओरिजन' च्या न्यू शेफर्ड या अंतराळयानाने हे सगळेजण अंतराळात झेपावले. स्पेस टुरिझम म्हणजे अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी हे अंतराळ यान डिझाईन करण्यात आले आहे. 

  अमेरिकन अब्‍जाधीश बिझनेसमन आणि ‘अमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस मंगळवारी (२० जुलै) इतर तीन जणांसोबत अंतराळात झेपावले. या अंतराळ वारीमध्ये बेझोस यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क बेझोस, ८२ वर्षांचे माजी पायलट व्हॅली फ्रॅंक आणि १८ वर्षांचा विद्यार्थी ऑलिव्हर डायमन हे आहेत.

  बेझोस यांची कंपनी ‘ब्ल्यू ओरिजन’ च्या न्यू शेफर्ड या अंतराळयानाने हे सगळेजण अंतराळात झेपावले. स्पेस टुरिझम म्हणजे अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी हे अंतराळ यान डिझाईन करण्यात आले आहे.

  उड्डाणापूर्वी  एका मुलाखतीत बेझोस म्हणाले,  लोक मला विचारतात मी नर्व्हस आहे का? खरं सांगायचं तर मी नर्व्हस नाही. मी उत्साहात आहे. यातून काय शिकायला मिळतं, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. बेझोस पुढे म्हणाले, आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, अंतराळ यान तयार आहे, क्रू तयार आहे आणि आमची टीम अद्भुत आहे. या सगळ्याबद्दल मला खरंच छान वाटतंय.

  १९६० च्या दशकामध्ये मर्क्युरी १३ नावाचा एक गट तयार करण्यात आला होता. यामध्ये व्हॅली फ्रॅंक यांचाही समावेश होता. पुरुष अंतराळ प्रवाशांप्रमाणेच या महिलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि स्क्रिनींगची प्रक्रिया पार पाडावी लागली. पण त्यांना अंतराळात जाण्याची संधी देण्यात आली नव्हती.

  भारतीय वेळेनुसार मंगळवारी (२०जुलै) संध्याकाळी साडेसहा वाजता न्यू शेफर्ड यान अमेरिकेच्या टेक्सास मधून उड्डाण करेल. जेफ बेझोस यांची खासगी लॉन्च साईट असणाऱ्या वॅन हॉर्न येथून, एका रॉकेटच्या माध्यमातून हे यान लॉन्च करण्यात येईल.

  जेफ बेझोस, त्यांचा भाऊ मार्क बेझोस, वॅली फ्रॅंक आणि ऑलिव्हर डायमन यांना घेऊन ही स्पेस कॅप्सूल त्यांच्या बूस्टरपासून जवळपास ७६ किलोमीटरच्या उंचीवर असताना वेगळी होईल. त्यानंतर हे रॉकेट लॉन्च पॅड पासून दोन मैल अंतरावर त्याच्या पायांवर लँड होईल. तर कॅप्सुल अंतराळात १०६ किलोमीटरपर्यंत आपला मार्ग कापत राहील.