corona effect on Christmas party

जगभरातील कोरोना रुग्णांची(corona patients in world) संख्या सात कोटींच्या पुढे गेली आहे. त्यातील ४.९१ कोटी जण बरे झाले असले तरी कोरोनांमुळे सुमारे १५ लाख ८७ हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. जो बायडेन यांच्या सल्लागारांनी ख्रिसमस पार्ट्यांपासून(Christmas party) दूर राहा, असा सल्ला अमेरिकावासियांना दिला आहे.

वॉश्गिंटन : जगभरातील कोरोना रुग्णांची(corona patients in world) संख्या सात कोटींच्या पुढे गेली आहे. त्यातील ४.९१ कोटी जण बरे झाले असले तरी कोरोनांमुळे सुमारे १५ लाख ८७ हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेतील कोरोना संक्रमितांचा आकडा हा सर्वाधिक १.६० कोटींच्याही अधिक आहे, तर आत्तापर्यंत अमेरिकेत २.९९ लाख जण कोरोनामुळे दगावले आहेत. बुधवारी एकाच दिवसात कोरोनामुळे तीन हजार जणांच्या झालेल्या मृत्यूनंतर सरकारवर दबाव वाढला आहे. जो बायडेन यांच्या सल्लागारांनी ख्रिसमस पार्ट्यांपासून दूर राहा, असा सल्ला अमेरिकावासियांना(christmas party in America) दिला आहे. जर्मनीतही रुग्णांची संख्या अटोक्यात येत नसल्याने सरकारवर दबाव आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही, नागरिक मात्र नियम मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे कठोर पावले उचलण्याच्या विचारात जर्मनचे सरकार आहे.

यंदा होणार नाहीत ख्रिसमस पार्ट्या
जो बायडेन यांनी निवडून आल्यानंतर कोरोना व्हायरसबाबत सल्लागार समिती गठित केली आहे. या समितीचे प्रमुख डॉक्टर माइकल ओस्टरहोम यांनी यंदा ख्रिसमस पार्ट्या करु नका, असे आवाहन देशातील नागरिकांना केले आहे. येत्या तीन ते सहा आठवड्यात अधिक सतर्कता बाळगण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. थँक्सगिव्हिंग डेच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सुट्टीच्या काळात, नागरिकांनी नियमांचे पालन केले नसल्याने आणि बेजबाबदारपणे वागल्याने त्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुढच्या तीन ते सहा आठवड्यांच्या काळात कोरोना संपेल, असा माझ्या विधानाचा अर्थ घेऊ नका. या काळात रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस कधी आणि कुणाला मिळेल, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच, सर्वसामान्यांपर्यंत लस पोहोचण्यासाठी मार्च-एप्रिलपर्यंत थांबावे लागणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि नर्सिंग होममध्ये लसीकरण पहिल्यांदा करण्यात येईल. अमेरिकेतील नागरिकांची सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि मास्क परिधान करावा. देशात कुणीही ख्रिसमस पार्टी करु नये.

थँक्सगिव्हिंग डे पडला भारी
अमेरिकेत बुधवारी एका दिवसात ३२६०हून अधिक जणांचा मृत्यू झाला. कोरोना संक्रमण सुरु झाल्यानंतर एकाच दिवसातील मृतांचा हा उच्चांक आहे. थंक्सगिव्हिंग डेसाठी गेल्या आठवड्यात असलेल्या सुट्ट्या हे यामागचे प्रमुख कारण मानण्यात येते आहे. या काळात अनेक जण प्रवासाला बाहेर पडले, अमेक ठिकाणी एकत्रित पार्ट्या आयोजित करण्यात आल्या. सरकारने दिलेल्या इशाऱ्याकडे जनतेने दुर्लक्ष केले, त्यामुळे प्रकरणेही वाढली आणि मृत्यूही.

फ्रान्सच्या पावलावर जर्मनीचे पाऊल
फ्रान्समध्ये सहा ऑठवड्यांच्या कठोर लॉकडाऊननंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दोन आठवड्यांपूर्वी जिथे दिवसाला ५० हजार रुग्ण सापडत होते,ती संख्या लॉकडाऊनमुळे १०-११ हजारांवर आली. नागरिकांनीही सरकारला सहकार्य केल्याने हे शक्य होऊ शकले. आता जर्मनीतील एंजेला मर्केल सरकारही बर्लिनपासून याची सुरुवात करते आहे. येत्या दोन दिवसांत येथील बाजरपेठा बंद केल्या जाण्याची शक्यता आहे, सुरुवातीच्या काळात दोन आठवड्यांसाठी ही बंदी लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन हा शब्द सरकारकडून वापरण्यात येत नाहीये, पण कृती मात्र त्याच दिशेने आहे.

ब्राझीलमध्येही रुग्णसंख्या वाढली
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कठोर उपाययोजना करण्यास सांगितले होते. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन ब्राझीलमध्ये योग्य प्रकारे झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून बुधवारी ५३ हजार ४५३ नवे रुग्ण सापडले आहेत. याहून अधिक रुग्ण संख्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. देशात आत्तापर्यंत ६ लाख रुग्ण झाले आहेत, त्यांतील १.७८ लाखआंहून अधिकजण मृत्यू पावले आहेत.

कोरोना प्रभावित टॉप-१० देश – अमेरिका, भारत ,ब्राजील रशिया, फ्रान्स, इटली, युके, स्पेन अर्जेंटीना, कोलंबिया